नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला रविवारी ससंदेच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.


राष्ट्रपतींचं अभिभाषण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बजेट सत्रात तीन तलाक विधेयकासह वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. विरोधकांच्या गोंधळाची देखील या दरम्यान शक्यता आहे. लोकसभा, राज्यसभेच्या सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रपतींच्या  अभिभाषणाने या सत्राला सुरुवात होईल. सूत्रांच्या माहितीनुसार संसदेत अभिभाषणात राष्ट्रपती कोविंद हे मागासलेल्या वर्गाच्या विकासासाठी आणि सशक्तीकरणासाठी सरकारने जोर द्यावा असं अधोरेखीत करु शकतात.


सरकारने ही बोलावली बैठक


सरकारने देखील रविवारी बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदी आणि विरोधीपक्ष नेता त्या मुद्द्यांवर चर्चा करु शकतात जे मुद्दे संसदेत मांडले जाणार आहेत. या सत्राचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत चालेल. या दरम्यान सरकार 29 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण लादर करेल. 1 फेब्रुवारीला केंद्रीय बजेट सादर केला जाईल. 9 फेब्रुवारीनंतर काही काळ अवकाश असेल त्यानंतर 5 मार्चला संसदेच्या बजेट सत्राच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. हे सत्र 6 एप्रिलपर्यंत चालेल.