Thyrocare founder A Velumani Success Story: जर तुम्ही इमानदारीने प्रयत्न कराल तर यश नक्कीच मिळेल. हे वाक्य खरे करुन दाखवले आहे ते एका व्यक्तीने. या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाचे खर्च कधीकाळी फक्त 50 रुपये होता. साधे कपडे घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे. या आर्थिक परिस्थितीवर मात करुन आज त्यांनी करोडो रुपयांची कंपनी उभी केली आहे. ही गोष्ट आहे ती थायरोकेअर टेक्नोलॉजीज लिमिटेडचे फाउंडर, चेअरमॅन आणि एमडी ए वेलुमणि यांची. अलीकडेच त्यांचे एक पॉडकास्ट व्हायरल झाले होते. त्यात ते त्यांचा संघर्ष आणि पत्नीच्या निधनाबद्दल सांगताना भावून झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेलुमणी यांचा जन्म तामिळनाडूच्या कोइंबतूर येथील एका गरीब परिवारात झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईच्या खांद्यावर आली. तीन भाऊ-बहिण असलेल्या त्यांच्या कुटुंबात वेलुमणी हे सगळ्यात मोठे होते. त्यांच्या आईने त्यांना शिक्षण घेण्यापासून कधीच रोखलं नाही. 50 रुपयांत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गुजराण करावी लागत होती. वेलुमणी त्यांच्या आईचा संघर्ष पाहत होते. त्यानी अभ्यासाबरोबरच एका केमिस्टच्या दुकानात नोकरी करण्याचा विचार केला. तिथे त्यांना 150 रुपये पगार मिळत होता. 50 रुपये स्वतःजवळ ठेवून ते बाकीचे पैसे आईला द्यायचे. 


केमिस्टच्या दुकानात काम करत असतानाच त्यांनी त्यांचे शिक्षण सुरूच ठेवले. पीएचडीची डिग्री मिळवल्यानंतर त्यांनी भाभा ऑटोमिक रिसर्ट सेंटरमध्ये लॅब असिस्टेंट या पदावर नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांचे लग्न सुमति वेलुमणी यांच्यासोबत झाले. सुमती तेव्हा बँकेत काम करायच्या. 14 वर्षे नोकरी केल्यानंतर वेलुमणी यांनी नोकरी सोडली. काही सेव्हिंग व पीएफच्या पैसे साठवून त्यांनी 1995मध्ये थायरोकेअर ची सुरुवात केली. मुंबईत त्यांनी पहिली लॅब सुरु केली. सुरुवातील त्यांना फक्त एक-दोन जणच टेस्ट साठी येऊ लागले. पण त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाही. रात्रभर त्यांना लॅबमध्येच राहावे लागायचे. प्रयत्नांना फळ मिळू लागले आणि हळूहळू त्यांचे काम सुरू झाले.


कंपनी मोठी करण्यासाठी ते सुरुवातीला पगारदेखील घेत नव्हते. कमावलेले सर्व पैसे ते कंपनीतच गुंतवत असतं. त्यावेळी त्यांच्या या काळात त्यांच्या पत्नीने पूर्ण पाठिंबा दिला. वेलुमणी हे त्यांचे सारे श्रेय त्यांच्या पत्नीला देतात. त्यांच्या संघर्षात त्यांच्या पत्नीने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला, परंतु २०१६ मध्ये, त्यांच्या कंपनीच्या IPO च्या ५० दिवस आधी त्यांना कळले की त्यांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. त्यांच्या पत्नीने त्यांची आयुष्यभर साथ दिली. मात्र जेव्हा त्यांना यश मिळू लागले तेव्हा मात्र त्यांच्या पत्नीने त्यांची साथ सोडली होती. आज  वेलुमणी यांच्या कंपनीचे मार्केट कॅप 3300 कोटी रुपये आहे.