फ्रेंच कंपनी करणार पंतजलीत ३,००० कोटींची गुंतवणुक...
पंतजलीचे प्रवक्ते एसके गुप्ता तिजारवाला यांनी टविट करून यासंबंधीची माहिती दिली.
नवी दिल्ली : पंतजलीचे प्रवक्ते एसके गुप्ता तिजारवाला यांनी टविट करून यासंबंधीची माहिती दिली.
लुईस विटॉनची गुंतवणुक
फ्रेंच लक्झरी गृप लुईस विटॉन पतंजलीमध्ये तब्बल ३२५० कोटी रुपये गुंतवण्यास इच्छूक आहे. पंतजलीचे एमडी, आचार्य बालकृष्ण यांच्या म्हणण्यानुसार, परदेशी तंत्रज्ञान आपल्या हितासाठी वापरण्याचा हा एक भाग आहे. परदेशी गुंतवणुक आपल्या देशाच्या हितासाठी वापरण्यास आम्हाला संकोच वाटत नाही. पण ही गुंतवणुक आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर घेऊ असं त्यांनी म्हटलंय.
पतंजलीचा विस्तार
पंतजली आयुर्वेद कंपनीला १०,१०० एकरांवर औषधी वनस्पतींची लागवड करायची आहे. त्याचबरोबर नागपूर, ग्रेटर नॉयडा, आसाम, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा आणि राजस्थान इथे उत्पादन सुरू करायचं आहे. यासाठी कंपनीला ५,००० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
रामदेव बाबांची घोडदौड
रामदेव बाबांनी मेड इन इंडीया उत्पादनांचा पुरस्कार केला आहे. भारतीय उत्पादनांचा खप वाढावा म्हणून ते प्रयत्नशील आहे. २०१९ पर्यंत पतंजली युनीलिव्हरला मागे टाकेल, तसंच २०२१ पर्यंत पंतजली जगातली सर्वात मोठी एफएमसीजी (दैनंदिन वापरातील उत्पादनं) कंपनी बनेल, असं रामदेव बाबांनी सांगितलं आहे.