नववधूच्या वेशात गर्लफ्रेंडला भेटायला पोहोचला रोमिओ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...
गर्लफ्रेंडला भेटायला नववधू बनून लग्नात पोहोचला खरा...पण घडलं काही भलतंच पाहा व्हिडीओ
नवी दिल्ली : प्रेमात कधी कधी तरुण किंवा तरुण अशा काही गोष्टी करतात जिथे हसावं की रडावं हा प्रश्नही पडतो. गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी काय जुगाड करतील याचा काही नेम नाही. लॉकडाऊनमध्ये देखील गर्लफ्रेंडसाठी वेगवेगळे जुगाड केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले होते. आता मात्र कहर झाला.
गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी थेट नववधूचा वेश घेऊन बॉयफ्रेंड आला. मात्र त्याच्यासोबत उलटाच प्रकार घडला. गर्लफ्रेंड भेटण्याऐवजी काहीतरी वेगळंच मिळालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी नववधूचा वेश परिधान करतो. त्याच अवस्थेत तो गर्लफ्रेंडच्या घरात घुसतो. जिथे तिच्या लग्नाचे विधी सुरू असतात. या मुलीचा EX बॉयफ्रेंड तिच्या घरात नववधूचा वेश करून घुसतो.
मुलीच्या कुटुंबियांना त्याच्यावर संशय येतो. या प्रियकराचं भिंग फुटतं. गर्लफ्रेंडच्या कुटुंबातील लोक तिच्या पाठलाग करून त्याला पकडतात आणि त्याच्या चेहऱ्यावरून पदर काढण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी हा तरुण आपला चेहरा लपवण्यासाठी धडपड करतो. आपला प्लॅन फसल्याचं पाहून हा तरुण तिथून काढता पाय घेतो.
हा व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हा व्हिडीओ व्हायरल आहे. झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही.