मुंबई : लग्न हे एक असे बंधन आहे, ज्यामुळे दोन व्यक्तींचे मिलन तर होतेच, पण ते दोन कुटुंबांचे देखील मिलन होते. त्यामुळे प्रत्येकालाच आपलं लग्न खूप अनोखं असावं असं वाटतं, जे जगाला दीर्घकाळ स्मरणात राहिल, पण कधी-कधी लग्नांमध्येही अशा घटना घडतात, त्यामुळे त्या लग्नांची चर्चा दूरवर होत असते. अशाच एका लग्नाची सध्या खूप चर्चा होत आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये लग्नाचा स्टेज सजवण्यात आला होता आणि मंचावर वधू-वर उपस्थित होते. ते एकमेकांना हार घालण्याच्या तयारीत असतानाच तेवढ्यात एक तरुण अचानक वर आला आणि वधूला सिंदूर भरू लागला. यादरम्यान वधूलाही धक्का बसला आणि स्टेजवर उपस्थित बाकीचे लोकही आश्चर्यचकित झाले, त्यांना अचानक काय झाले ते समजू शकले नाही. मात्र, ही बाब समजल्यानंतर लोकांनी त्याला मंचावरून खाली नेले.



ही धक्कादायक घटना गोरखपूरच्या हरपूर बुधात पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने ही 'टोटल फिल्मी' घटना असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली की 'चिमूटभर सिंदूराची किंमत काय माहीत'.


अशाच एका युजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर स्वरात लिहिले आहे, 'पद्मश्री पुरस्कार द्यायला हवा', तर दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की, 'तो एक निडर आणि साहसी प्रेमी आहे.


सोशल मीडिया अशा मजेशीर कमेंट्सने भरलेला आहे. एका यूजरने आशिकचे हे कृत्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे आणि लिहिले, 'चुकीचे झाले. जे काही करायचे होते ते लग्नाआधी केले पाहिजे.


मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. वधूला जबरदस्तीने सिंदूर भरणारा तरुण त्याच्या घरी गेला. त्याचवेळी वराची समजूत घालून लग्नाचे विधी पूर्ण करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वधूला वरासह निरोप देण्यात आला.