Boy Flew Away With GirlFriend: प्रेयसीसोबत नवीन आयुष्य सुरु करायचं होतं. (Love Affair) घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्याने प्रेयसीला पळवून नेले. मात्र, अर्ध्या रस्त्यातच त्यांच्याकडील पैसे संपले आणि दोघांनीही संपूर्ण रात्र मंदिरात जागून काढली. पोलिसांना (Police) मंदिरात प्रेमीयुगुल थांबल्याचे कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. तर दोघांची कहाणी ऐकून पोलिसांनी कपाळावरच हात मारुन घेतला. (GirlFriend And Boyfriend News)


एकमेकांसोबत आयुष्य घालवायचे होते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या मुझफ्फरपूरमधील ही घटना आहे. दोघांचीही फेसबुकवर ओळख झाली होती. नंतर दोघे प्रेमात पडले. आता दोघांनाही एकमेकांसोबत जगायचे होते. म्हणून त्यांनी घर सोडायचा निर्णय घेतला. तरुण घरातून हजार रुपये घेऊन बाहेर पडला होता. मात्र, रस्त्यातच त्याचे पैसे संपले. अशावेळी दोघांनीही एका मंदिराचा आसरा घेतला. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना या दोघांबद्दलही कळले. 


खिशात हजार रुपये घेऊन प्रेयसीसोबत निघाला


पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली तेव्हा तरुण मुजफ्फरपूरमधील मोतीपुर येथे राहणारा आहे तर त्याची प्रेयसी सीतामढीमधील नानपुर येथे राहणारी आहे. एक वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर नवं आयुष्य सुरु करण्यासाठी त्यांनी घर सोडले. घरातून एक हजार रुपये घेऊन ते निघाले होते. घरातून निघाल्यानंतर त्यांनी बाईकमध्ये 500 रुपयांचे पेट्रोल टाकले होते. 500 रुपये खिशात घेऊन तो प्रेयसीसोबत निघाला होता. मात्र रस्त्यात इतर पैसेदेखील खर्च झाले. 


गाडीतील पेट्रोल संपले


इतकंच नव्हे तर, घरातून पळून आल्यानंतर एका अंतरावर गाडीतील पेट्रोलदेखील संपले होते. रात्रीच्या वेळी अशी परिस्थिती उद्भवल्याने दोघेही चिंतेत पडले. रात्री प्रवास करणे सुरक्षित नसल्याने दोघांनीही एका मंदिरात थांबण्याचे ठरवले. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या नजरेस ते दोघे पडले. तेव्हा दोघांची चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या खरा प्रकार लक्षात आला. 


पोलिसांनी दिला दोघांना इशारा 


दोघांनाही पोलिस ठाण्यात नेण्यात आले व तिथे दोघांच्या घरच्यांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. तसंच दोघांकडूनही त्यांच्या घरचे पत्तेही घेण्यात आले.  दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही प्रेमीयुगुलांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून पीआर बॉन्डदेखील लिहून घेतला आहे. तसंच, भविष्यात अशी चूक पुन्हा न करण्याची सक्त ताकिदही दिली आहे.