नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांना एक खुशखबर दिली आहे. रेल्वेकडून महिलांसाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. यानुसार महिलांना रेल्वे बर्थवरून होणा-या समस्येतून सुटका मिळणार आहे. 


काय आहे नियम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांसाठी रेल्वेने आता लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. विविध कोचमध्ये महिलांसाठीच्या लोअर बर्थची संख्या निश्चित करण्यात आलीये. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मेल आणि एक्सप्रेस रेल्वेच्या सर्वच स्लीपर क्लासच्या कोचमध्ये सहा-सहा बर्थ महिलांसाठी आरक्षित केले जातील. सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर ही सुविधा लागू केली जाणार आहे. त्यासोबतच गरीब रथच्या एसी-३ कोचमध्येही सहा बर्थ रिझर्व्ह करण्यात आले आहेत. तसेच ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांसाठीही मेल आणि एक्सप्रेस रेल्वेच्या थर्ड एसी-सेकेंड एसी कोचमध्ये ३-३ बर्थ रिझर्व्ह करण्यात आले आहेत. 


नव्या सॉफ्टवेअरमध्ये मिळणार फायदा


बोर्डानुसार राजधानी आणि दुरोंतोसोबतच पूर्णपणे एसी रेल्वेच्या एसी-३ मध्ये चार लोअर बर्थचा कोटा निश्चित करण्यात आलाय. महिला प्रवाशांसाठी लोअर बर्थ निश्चित करण्यासाठी आयटी शाखा क्रिसकडून रिझर्वेशन सिस्टममध्ये नवीन सॉफ्टवेअर विकसीत केलं जात आहे. 


आधी पहिलांची वेटिंग होणार क्लिअर


आता वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची वाट पाहणा-या महिला प्रवाशांनाही दिलासा मिळू शकतो. रेल्वेकडून आता वेटिंग तिकीट कन्फर्म करण्यात महिलांना त्यांच्या वयानुसार प्राधान्य देण्याची सिस्टम डेव्हलप करत आहे. इतकेच नाहीतर रेल्वेत बर्थ रिकामा असल्यास टीटीई सुद्धा महिलांनाच प्रथम बर्थ देणार. 


ज्येष्ठ नागरिकांचा कोटा


रेल्वेत वरिष्ठ नागरीकांसाठी आता वेगळा कोटा ठेवला जाणार आहे. वयोवृद्ध नागरीकांनाही लोअर बर्थ देण्याची सिस्टम तयार होत आहे. रेल्वे अधिका-यांनुसार लोअर बर्थ रिकामा असल्यास इतर प्रवासी तो बुक करू शकतील.