मुंबई: एलपीजी ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता. LPG सिलेंडर आत्ताच बुक कराहा विनोदांचा खेळ आहे. आता गॅस सिलिंडरसाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यावा लागेल आणि LPG सिलिंडर तुमच्या दारात असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन ऑइल (IOC) आपल्या ग्राहकांना ऑफर करत आहे. आता तुम्ही फक्त मिस कॉल करून तुमचा एलपीजी सिलिंडर देशाच्या कोणत्याही ठिकाणहून आता बुक करू शकता. IOC ने मिस्ड कॉलद्वारे एलपीजी सिलेंडर बुक करण्याची सुविधा वाढवली आहे.त्याची सुरुवात या वर्षीच्या फेब्रुवारीमध्येच झाली होती. 


यापूर्वी ग्राहकांना कस्टमर केअरमध्ये जाऊन बराच वेळ कॉल होल्ड करून ठेवावा लागत होता. मात्र आता तसे करण्याची गरज नाही. फक्त एक मिस कॉल आणि गॅस सिलिंडर तुमच्या दारात पोहोचवला जाईल. IOC ने याची माहिती ट्वीट करून ग्राहकांना दिली आहे. 


IOC मिस्ड कॉलसाठी नंबर देण्यात आला आहे. 8454955555 या नंबरवर मिस्ड कॉल देऊ शकता. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून दिलेला मिस्ड कॉल वैध धरला जाणार आहे. त्यासाठी ग्राहकांना कोणतेही ज्यादा पैसे मोजावे लागणार नाहीत.तुम्ही इंडेन ग्राहक असल्यास, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7718955555 वर कॉल करून एलपीजी गॅस सिलिंडर बुक करू शकता.


दुसरा मार्ग म्हणजे  Whatsapp,REFILL लिहून 7588888824 वर Whatsapp करू शकता. गॅस सिलिंडर तुमच्या दारात पोहोचवला जाईल.HP ग्राहक 9222201122 वर Whatsapp मेसेज पाठवून LPG सिलिंडर बुक करू शकतात. तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून BOOK टाइप करणे आवश्यक आहे. ९२२२२०११२२ या क्रमांकावर पाठवावेत.या क्रमांकावर तुम्ही सबसिडीशी संबंधित माहिती देखील मिळवू शकता.


भारत गॅस ग्राहकाने नोंदणीकृत मोबाईलवरून 1 किंवा 1800224344 या क्रमांकावर बुक पाठवावे. यानंतर तुमची बुकिंग विनंती एजन्सीद्वारे स्वीकारली जाईल आणि तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अलर्ट येईल.