नवीन वर्षाची भेट! LPG सिलिंडर थेट 100 रुपयांनी स्वस्त
LPG Cylinder : इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे.
मुंबई : LPG Cylinder : इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinder Rates) दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Commercial LPG Cylinder directly cheaper by Rs 100)
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी
याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही ही जनतेसाठी दिलासादायक बाब होती. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात (Commercial LPG Cylinder Rates) कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळाला आहे.
100 रुपयांच्या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2001 रुपयांवर आली आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2077 रुपयांवर आली आहे. मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1951 रुपये झाली आहे.
घरगुती सिलिंडरबाबत कोणताही बदल नाही
यावेळीही घरगुती सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती गेल्या ऑक्टोबरमध्ये वाढवण्यात आल्या होत्या. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. त्याचवेळी, कोलकातामध्ये त्याची किंमत 926 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर 915.50 रुपयांना मिळत आहे.
तुमच्या शहरातील सिलिंडरची किंमत जाणून घ्या
तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) नवीन किमती जाणून घ्यायच्या असतील, तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ते पाहू शकता. यासाठी तुम्ही IOCL वेबसाइटवर जा (cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_productprice). यानंतर, वेबसाइटवर राज्य, जिल्हा आणि वितरक निवडा आणि नंतर शोध पर्यायावर क्लिक करा. यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती तुमच्या समोर येतील.