घरगुती सिलेंडर महागला
अनुदानित एलपीजी सिलिंडर महागला
मुंबई : अनुदानित एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता भुर्दंड बसणार आहे. अनुदानित गॅससिलिंडर १ रुपया ७६ पैशांनी महाग झाला आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. इंडियन ऑईल कार्पोरेशननं या दरवाढीची घोषणा केली आहे. इंधन दरवाढ आणि करप्रणालीमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.
जेव्हा आंतरराष्ट्रीय किंमती वाढतात तेव्हा सरकार अधिक सबसिडी देते. पण कर नियमांनुसार घरगुती गॅसवर जीएसटी इंधनाच्या बाजार मूल्यावर ठरवली जाते. अशात सरकार इंधनच्या किंमतीतील एक भाग सबसिडी म्हणून दिली जाते. पण कर बाजार भावानुसार द्यावा लागतो. याचा परिणाम घरगुती गॅसवर झाला असून त्य़ाचा भाव वाढला आहे.
ग्राहकांना बाजार भावाच्या किंमतीतच सिंलेडर खरेदी करावा लागतो. पण सरकार वर्षभरात 14.2 किलोग्रॅमच्या 12 सिंलेडरवर सबसिडी देते. ही सबसिडी सरळ बँकेत जमा होते. याआधी सिलेंडर एक जुलैला पाऊने तीन रुपयांनी महागला होता. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरच्या मुळ किंमतीत बदल करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाववाढीचे परिणाम घरगुती गॅसवर देखील झाला आहे.