या महिन्यात दुसऱ्यांदा वाढल्या LPG सिलेंडरच्या किंमती
ऐन सणासुदीत घरगुती सिलेंडरच्या दरवाढीमुळे सामान्य माणसांचं दिवाळं निघालंय.
नवी दिल्ली : घरगुती गॅस एलपीजीच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ झालीयं. सरकाने एलपीजी डिलर्सच्या कमीशनमध्ये वाढ केल्यानंतर ही दरवाढ झालीयं. इंधन कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या सबसिडी वाल्या एलपीजी सिलेंडरची किंमत 507.42 रुपये इतकी झाली आहे. याआधी ही किंमत 505.34 रुपये होती. दरवाढ होण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. पेट्रोलियम मंत्रालयने डिलर कमीशन वाढविण्याचे आदेश दिले होते. 14.2 किलो आणि 5 किलो च्या सिलेंडरवरील घरगूती एलपीजी वितरकांच्या कमीशनमध्ये सप्टेंबर 2017 मध्ये क्रमश : 48.98 रुपये आणि 24.20 रुपये निश्चित केले होते.
शहर आणि किंमती
जूनपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत दरमहा वाढ होतेयं. उच्चतम किंमतीवर आकारलेला जीएसटी आणि एकूण किंमतीत 16.21 रुपयांची वाढ अशी यामगची कारणे आहेत.
मुंबईत 14.2 किलो च्या एलपीजी सिलेंडरची किंमत आता 505.05 रुपये झालीयं.
कोलकातामध्ये 510.70 इतकी तर चेन्नईमध्ये 495.39 रुपये आहे.
वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक कर तसेच परिवहन कर यावर या किंमती बदलत जात असतात.