LPG Gas Cylinder Price Hike: महागाईचा भडका, घरगुती LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
LPG Gas Cylinder Price Hike : महागाईचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे. घरगुती LPG आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. (LPG Gas Cylinder Price) बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत आता मुंबईत आणि दिल्लीत पाहा किती असणार आहे.
LPG Gas Cylinder Price Hike : महागाईचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे. घरगुती LPG सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (LPG Cylinder Price Today) बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत आता मुंबईत 1102.50 रुपये झाली आहे.
याआधी मुंबईत LPG सिलिंडरची किंमत 1,052.50 रुपये प्रति युनिट होती. जुलै महिन्यानंतर पुन्हा एकदा सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. दरम्यान, एलपीजी गॅसच्या किमतीत कपात होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच त्यात वाढ करण्यात आल्याने गृहिणींचे बजेट आता कोडलमडणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
व्यावसायिक वापराच्या सिलिंडर दरातही वाढ (LPG Cylinder Price in Delhi)
दिल्लीत आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत 1103 प्रति सिलिंडर असणार आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे या वाढीमुळे 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 2119.50 रुपयांच्या घरात असणार आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. तसेच स्थानिक करांमुळे घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती एका राज्यानुसार बदलतात. इंधन विक्रेते दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात आणि त्यानुसार दर ढरविले जातात. गेल्यावर्षी 1 मे 2022 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत विक्रमी 2355.50 इतकी होती.
यापूर्वी व्यावसायिक वापराचा सिलिंडर 1769 रुपयांना मिळत होता. 1 जानेवारी रोजी या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढली होती. आता त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. तीन राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. आता पुन्हा सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे, अशी ग्राहकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, वर्षाला सबसिडीच्या दरात 12 सिलिंडर मिळतात. त्यानंतर सिलिंडर घेणाऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. अर्थात ग्राहकांना एलपीजी सिलिंडरची कोणतीही अतिरिक्त खरेदी बाजारभावाने करणे भाग पडणार आहे. वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असणारी जनता अधिक महागाईत भरडली जाणार आहे. दुसरीकडे परकीय चलन दर, कच्च्या तेलाच्या किमती यांसारख्या अनेक घटकांवर सबसिडी अवलंबून असते.