LPG Price Cut : देशात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) पहिले दोन टप्पे पार पडले असून, त्यादरम्यानच नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सिलेंडरच्या दरात नुकतीच करण्यात आलेली कपातही त्याच निर्णयांपैकी एक. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन उत्पादन कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयासह एक नवी सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपलब्ध माहितीनुसार शासन आणि तेल उत्पादन कंपन्यांच्या वतीनं 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरचे दर 19 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, सदर निर्णयानंतर या सिलेंडरची किंमत 1745.50 रुपयांवर पोहोचली आहे. संपूर्ण देशभरात हे नवे दर लागू झाले असून, मागील महिन्यातही असाच निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 


एप्रिल महिन्यात इंधन कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात साधारण 30.50 रुपयांची घट केली होती. त्याआधी मार्च आणि फेब्रुवारी महिन्यात मात्र हे दर 25.5 रुपये आणि 14 रुपयांनी अनुक्रमे वाढले होते. सध्याच्या घडीला सिलेंडरच्या दरांमध्ये करण्यात आलेल्या कपातीनंतर आता दिल्लीमध्ये सिलेंडरचे दर 1745.50 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, कोलकाता येथे व्यावसायिक सिलेंडरचे दर 1859 रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबई आणि चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे 1698.50, 1911 रुपयांवर पोहोचले आहेत. 


हेसुद्धा वाचा : 'भटकती आत्मा' वरून वार-पलटवार, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललय काय?