मुंबई : तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. (LPG Subsidy) अनुदानाचे पैसे सरकारने पुन्हा एकदा ग्राहकांच्या खात्यात वर्ग केले आहेत. आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये ते 237.78 रुपये प्रति सिलिंडरपर्यंत सबसिडी दिली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत जर तुम्हीही एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करत असाल आणि सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात येत नसतील तर तुम्ही त्याबाबत तक्रारही करू शकता.


हेदेखील वाचा - स्टार हेल्थच्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा; पुढे काय करावे सांगताहेत अनिल सिंघवी


एलपीजी गॅस ग्राहकांना प्रति सिलिंडर 79.26 रुपये अनुदान म्हणून दिले जात आहे. पण, ग्राहकांना वेगवेगळी सबसिडी मिळत आहे. अशा स्थितीत किती पटींनी अनुदान मिळते, असा संभ्रम लोकांमध्ये आहे.


वास्तविक, अनेकांना 79.26 रुपये अनुदान मिळत आहे, तर अनेकांना 158.52 रुपये किंवा 237.78 रुपये अनुदान मिळत आहे. त्यामुळे आपण एका सोप्या प्रक्रियेद्वारे आपल्या खात्यात अनुदान आले आहे की नाही हे तपासू शकता.


तुमच्या सबसिडीचे पैसे तपासा


  • सर्वप्रथम इंडियन ऑइलच्या https://cx.indianoil.in/ वेबसाइटवर जा.

  • आता तुम्हाला Subsidy Status वर क्लिक करून पुढे जावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला Subsidy Related (PAHAL) या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला Subsidy Not Received वर क्लिक करावे लागेल.

  • तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि एलपीजी आयडी नमूद करा.

  • त्यानंतर त्याची पडताळणी करून सबमिट करा.

  • यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती समोर येईल.