नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील लखनऊमध्ये एका घरात स्फोट झाल्याचं वृत्त समोर येत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. स्फोटानंतर अनेकजण अद्यापही घरामध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊमधील काकोरी परिसरात एका घरात अचानक स्फोट झाला. आतापर्यंत घरातून तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरु आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, ज्या घरात स्फोट झाला त्या घरात अनधिकृतपणे फटाक्यांचा व्यवसाय केला जात होता.



हा स्फोट इतका भीषण होता की घराच्या विटा जवळपास ५० मीटरपर्यंत लांब उडाल्या. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळी नागरिकांना जाण्यास बंदी घातली आहे. मात्र, अद्याप या स्फोटासंदर्भात पोलिसांनी कुठलीही अधिक माहिती दिलेली नाहीये.