पठाणकोट : जेव्हाही तीन-चार मित्र एकत्र येतात तेव्हा रिकाम्या वेळात ते मोबाईलमध्ये लूडो गेम खेळताना बघायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून या गेमची क्रेझ खूप जास्त वाढली आहे. मात्र, आता हा गेम तुम्हाला तुरुंगातही पोहचवू शकतो. 


गेम झालेत जुगाराचा अड्डा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल गेम सध्या लोकं मनोरंजनासाठी किंवा टाईमपाससाठी राहिलेले नसून ते जुगाराचा अड्डा होत आहे. जुगारासाठी पत्ते, पूल इत्यादी खेळांचा प्रयोग अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण आता या यादीत लूडो मोबाईल गेमही सामिल झाला आहे. या गेमबाबत तरूणांमध्ये चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे. याने काही धोकाही नाहीये. पण काही लोकांनी या गेमवर पैशांचा जुगार लावणे सुरू केले आहे. शहरातील अनेक परिसरांमध्ये तरूण गेम खेळताना दिसत आहेत. 


तरूणाई प्रभावित


हा गेम मोबाईल असल्याने तरूणवर्ग यामुळे जास्त प्रभावित झालेले दिसताहेत. मोबाईल गेम्स लोकांच्या मनोरंजनासाठी तयार केले जातात. पण याप्रकारे गेमचा चुकीचा फायदा काही लोक घेऊन अवैध काम करत आहेत. 


याआधीही कारवाई


शहरात काही महिन्यांपूर्वी काही परिसरांमध्ये चालू असलेल्या पूल टेबलांवर जुगार खेळला जात होता. ज्यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई सुद्धा केली होती. त्यावेळी पूल टेबलची क्रेझ अधिक होती. पूल टेबलवर तरूण जुगार खेळत होते. त्यामुळे अनेक वाद निर्माण होत असे. 


पोलीस टाकणार रेड


यासंबंधी डीएसपी सुखविंदर म्हणाले की, सध्या असं कोणतं प्रकरण समोर आलेलं नाहीये. पण जर शहरात असं काही अवैध काम सुरू असेल तर पोलिसांकडून टीम तयार करून संवेदनशील स्थानांवर रेड टाकली जाईल.