मुंबई : जगभरात आज संध्याकाळी 4.21 वाजल्यापासून चंद्रग्रहण दिसलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्राने यावेळी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आहे. तसेच 6.21 ला पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडली आणि सगळीकडे काळोख झाला. 7.37 वाजता अगदी तो रक्तचंदनाप्रमाणे दिसला. तसेच रात्री 9.38 वाजता चंद्रग्रहण समाप्त झालं. चंद्रग्रहणादरम्यान चंद्र लाल दिसत होता. याप्रमाणे ब्लड मून अर्थात रक्त चंदनाप्रमाणे दिसला आहे. सामान्यापेक्षा 10 टक्के हा चंद्र मोठ्या प्रमाणात दिसला. 



2018 मधील पहिले चंद्रग्रहण 31 जानेवारीला असून वर्षातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण 27 जुलैला राहील. माघ शुक्ल पौर्णिमेला होणारे हे ग्रहण संपूर्ण भारतासहित उत्तर पूर्वी युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर पश्चिम आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, अटलांटिक, हिंद महासागर, अंटार्टिकामध्ये दिसेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी ग्रहण सुरु होईल, जे रात्री 8 वाजून 40 मिनिटांपर्यंत राहील. अशाप्रकारे ग्रहण काळ एकूण 2 तास 45 मिनिट असेल. पूर्व भारत, आसाम, नागालँड, मिझोरम, सिक्कीम तसेच बंगाल क्षेत्रामध्ये ग्रहण प्रारंभ होण्यापूर्वीच चंद्रोदय होईल यामुळे या क्षेत्रांमध्ये खग्रास स्वरूपात चंद्रग्रहण दिसेल.



खग्रास चंद्रग्रहण आहे. पूर्वेकडील प्रशांत महासागराच्या मध्यभागी खग्रास चंद्रग्रहण पूर्ण झाले. मात्र, भारतात हे ग्रहण सुटण्याच्या कालावधीत दिसणार असल्याने ते खंडग्रास अवस्थेत दिसला.