...जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान आले धोनीचे नाव
सुप्रीम कोर्टात आधारच्या महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात आधारच्या महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला.
आधार सुनावणीदरम्यान गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी व्यक्तिगत डेटा लीक होण्याबाबत कोर्टात प्रश्न उपस्थित करण्यात आला. डेटा लीकबाबत बोलताना सुप्रीम कोर्टाने धोनीचा दाखला दिला. डेटा लीकप्रकरणी सेफगार्डची मागणी केली जाऊ शकते कारण भारताचा माजी कर्णधार धोनीचा डेटाही लीक झाला होता, असे कोर्टाने यावेळी म्हटले.
जेव्हा सरकारला माहिती द्यायची असते तेव्हाच प्रॉब्लेम का - सुप्रीम कोर्ट
दरम्यान, या सुनावणीदरम्यान कोर्टाने एक सवालही उपस्थित केला. तुम्ही जर खासगी कंपन्यांना वैयक्तिक माहिती पुरवू शकता. तर सरकारने माहिती मागितली तर काय होते असा सवाल सुप्रीम कोर्टाने यावेळी केला.
तुम्हाला विमा पॉलिसी हवीये तुम्ही खासगी कंपनीकडे जाता. तुम्हाला मोबाईल कनेक्शन हवेय तुम्ही खाजगी कंपन्यांकडे जाता. यावेळी तुम्ही या कंपन्यांना तुमची माहिती देता. मात्र जेव्हा सरकार तुमच्याकडे एखाद्या माहितीची विचारणा करते तेव्हा तुम्ही म्हणता माफ करा, अशा शब्दात कोर्टाने नाराजी व्यक्त केली.