भोपाळ : मध्य प्रदेशच्या 28 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे. पण त्याआधी बिहार विधानसभा निवडणुकीसह मध्यप्रदेश पोटनिवडणुकीचा एक्झिट पोलही समोर आला आहे. बिहारमध्ये एनडीए बहुमतापासून दूर असल्याचं दिसत असलं तरी मध्यप्रदेशमध्ये मात्र एक्झिट पोलमध्ये भाजपला दिलासा मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार मध्यप्रदेशात भाजप सरकार कायम राहणार आहे. काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठणं अवघड दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजतकच्या एक्झिट पोलनुसार मध्यप्रदेशात भाजपला 16 ते 18, काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 46 टक्के तर काँग्रेसला 43 मतं मिळण्याची शक्यता आहे.


मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी म्हटलं की, 'आम्ही आधीच म्हटलं होतं की आम्हाला शानदार यश मिळेल. काँग्रेस आणि कमलनाथ हैराण झाले आहेत. आधीपासून पराभवाच्या भूमिकेत आहेत. जोड-तोडचा आरोप करत आहेत. भाजप कोणाकडेच गेली नाही. काँग्रेसचे मित्रच भाजपकडे आले आहेत. आता त्यांनी पराभव स्विकारावा.'


राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटलं की, 10 नोव्हेंबरला नक्कीच काँग्रेसचा झेंडा राज्यात फडकेल. डिसेंबर 2018 मध्ये मध्यप्रदेश-छतीसगड आणि राजस्थानबाबतचा एक्झिट पोल आम्ही पाहिला आहे. लोकांनी देखील त्याचा परिणाम पाहिला आहे.'


मध्यप्रदेशातील सध्या स्थिती


भाजप - 107
काँग्रेस - 87
बसपा - 02
सपा - 01
अपक्ष - 04
रिक्त - 01


एकूण जागा - 230


बहुमताचा आकडा - 115


मार्चमध्ये एकूण 25 काँग्रेस आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये आले होते. त्यामुळे काँग्रेसची संख्या कमी झाल्याने राज्यातील सरकार पडलं होतं. 25 आमदारांचा राजीनामा तसेच 3 आमदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागा अशा एकूण 28 जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली.