Madhya Pradesh Crime : माणसानं दुसऱ्या माणसाचा जीव घेण्यासाठी म्हणजे हत्या करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर केल्याचं तुम्ही आजवर ऐकलं असेल. अशाच प्रत्यय मध्य प्रदेशातील (MP Crime New) मंदसौरमध्ये दिसून आला आहे.  मध्य प्रदेशात एका पतीने दोन लग्न केली. पहिली पत्नी पळून गेली म्हणून दुसरं लग्न केलं. पण दुसऱ्या पत्नीची नंतर नंतर अडचण वाटू लागल्याने तिच्या हत्येचा कट विषारी कट रचला. पण पोलिसांनी 5000 रुपयांचे बक्षीस असलेल्या गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीवर सुपारी घेऊन सापच्या मदतीने मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंदसौर जिल्हा मुख्यालयाच्या यशोधर्मन नगरच्या घटना असून आरोपीची पहिली पत्नी शानू बी घरातून दुसऱ्या पुरूषासोबत पळून गेली होती. मोजीमने दुसरं लग्न 2015 मध्ये  हलीमासोबत केलं. हलीमा आणि मोजीम सोबत राहून लागले होते. पण काही दिवसांनी अचानक शानू बी चे फोन मोजीमला येऊ लागले होते. मोजीमचा तिच्यासोबत संपर्क वाढला आणि त्याने पुन्हा शानू बी सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. 


वाचा:  ड्रग्जसाठी आला नवा कोडवर्ड, सर्रास टपरीवर वापरला जातो कोड, तुम्हाला माहितीय का?


शानू बी सोबत राहण्यासाठी मोजीमने हलीमासोबत भांडण केलं आणि हलीमाने त्याला घरातून काढण्याचा प्रयत्न केला. पण हलीमा कोणत्याही स्थितीत आपलं घर सोडण्यास तयार नव्हती. तिला विश्वास होता की, पती एक दिवस योग्य निर्णय घेईल. त्यामुळे ती सगळं सहन करत राहिली. त्या रात्रीची घटना आठवून हलीमा अजूनही घाबरते जेव्हा तिचा पती मोजीम आणि त्याच्या साथीदाराने तिच्यावर साप सोडण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवानं यातून हलीमा अगदी थोडक्यात बचावली. याप्रकरणी पतीला अटक देखील करण्यात आलीय. 2013 मध्ये मोजीम एनडीपीएसच्या एका केसमध्ये जोधपूर तुरूंगात कैद होता.