मुरैना: ट्रेनमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एसटी बोगीमध्ये आग लागल्याने प्रवाशांचीही तारांबळ उडाली. ही आग भीषण होती पाहता पाहता तिने रौद्र रुप धारण केलं. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील मुरैना इथे हेतमपूर रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडली आहे. दुर्ग-उधमपूर ट्रेनच्या AC कोचला आग लागली. ही आग वेगानं बोगीमध्ये पसरली. या आगीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. 



ही आग एका बोगीतूम दुसऱ्या बोगीत पसरली. या आगीतून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. रेल्वेच्या दोन बोगीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचं कारण समोर आलं नाही.


अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केलं आहे. घटनास्थळावर कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रेनच्या बोगीचं मोठं नुकसान झालं आहे.