भोपाळ : आपल्या पोलीस पतीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळताच पत्नीने लागलीच पतीच्या कार्यालयात थेट धाव घेतली. तिने याबाबत पतीला विचारणा केली. आपले भिंग फुटल्याचे समजताच पतीने पत्नीलाच अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीचे केस धरुन तिला खाली पाडले आणि मारहाण केली. सर्वांसमक्ष त्यांने पायातून चप्पल काढत मारहाण केली. काही लोकांनी मध्यस्ती करत हैवान पतीला बाजुला केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतीच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध केला म्हणून पत्नीला मारहाण केली. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात हा संतापजनक प्रकार घडला आहे. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते अशा पोलिसांने आपल्याच पत्नीला मारहाण केली. विवाहबाह्य संबंधांना विरोध केला म्हणून गांधवानी पोलीस ठाण्याचे प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्नीला बेदम मारहाण केली.



पोलीस पत्नीला मारहाण करीत असताना काही लोकांसह पोलीसही तिथे होते. ते नरेंद्रला अडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणी नरेंद्र सूर्यवंशीची चौकशी सुरु आहे. दरम्यान, सूर्यवंशी याच्या घरात एक तरुणी असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी तिलाही ताब्यात घेतले आहे.