Free Air Travel: फ्री फ्री फ्री...सरकारचा मोठा निर्णय! ज्येष्ठ नागरिकांना करता येणार विमानातून मोफत प्रवास
Free Air Travel for Senior Citizens: शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी विकास यात्रा काढण्यात येत आहेत. भिंड जिल्ह्यातील संत रविदासांचे स्मरण करून मुख्यमंत्र्यांनी या यात्रेचं उद्घाटन केलं.
Senior Citizens Free Air Travel : लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एकदातरी विमानात बसण्याचं (Air Travel) स्वप्न असतं. रेल्वे प्रवासासाठी आणि बस प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना अनेक सवलती दिल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारची सूट दिल्याने त्याचा फायदा त्यांना होतो. अशातच आता स्वतः मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी मोठी घोषणा केली आहे. (Madhya Pradesh Government Big decision for Free Air Travel for Senior Citizens)
भिंड येथील संत रविदास (Sant Ravidas) यांच्या जयंती आणि चंबळ विभागाच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री (MP Chief Minister) शिवराज सिंह चौहान यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior citizens) मोफत विमानसेवेची घोषणा केली आहे. त्यामुळे आता याची अंमलबजावणी कधी सुरू होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
मोफत विमान प्रवास
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुढील महिन्यापासून विमानाने तीर्थयात्रेला (pilgrimages) जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत. गरीब कल्याण हाच आमचा संकल्प आहे. त्यामुळेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमध्ये वंचितांची नावे पुन्हा जोडली जावी आणि ज्यांची नावे पूर्वी जोडली गेली होती त्यांना लाभ मिळावा, या उद्देशाने ही विकास यात्रा (Vikas Yatra) काढण्यात येत आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
आणखी वाचा - Turkey Earthquake: सलग तिसऱ्या भुकंपाने तुर्की हादरलं, 24 तासात मृतांचा आकडा 1500 पार!
दरम्यान, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये (MP News) विकास यात्रा काढण्यात येत आहेत. भिंड जिल्ह्यातील संत रविदासांचे स्मरण करून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या यात्रेचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्र्यांनी आज मुख्यमंत्री जनसेवा अभियानांतर्गत 3 लाख 77 हजारांहून अधिक स्वीकृती पत्रांचे वाटप केलं आणि 397 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 125 विकास कामांचे उद्घाटन केलंय.