मध्य प्रदेश : तब्बल 70 वर्षांनंतर भारतात (India) आठ चित्त्यांचे (cheetah) आगमन झालं आहे. नामिबियामधून (namibia) आलेल्या चित्त्यांना (cheetah) पाहण्याची लोकांमध्ये उत्सुकता आहे. अशातच देशात चित्त्यांची संख्या वाढवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कमधून (kuno national park) एक चांगली बातमी समोर आली आहे. 'आशा' (asha cheetah) नावाची मादी चिता गरोदर असल्याची बातमी समोर येत आहे. नामिबियातून (namibia) आलेल्या 8 चित्त्यांमध्ये 3 मादी चित्ता आहेत. यापैकी एक आशा या चित्त्याचे नाव खुद्द पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी दिले होते. 'आशा'ने चांगली बातमी दिल्याने लवकरच चित्त्यांची संख्या वाढणार असल्याची आशा वन अधिकाऱ्यांमध्ये  निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुनो राष्ट्रीय उद्यानात (kuno national park) पोजेक्ट चितावर (Project cheetah) लक्ष ठेवून असलेल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आशामध्ये गरोदर (pregnant) असल्याची लक्षणे दिसत आहेत. तिच्या वर्तन, शारीरिक आणि हार्मोनल बदलांमुळे गरोदरपणाची लक्षणे दिसत आहेत. चित्ता प्रकल्पाशी (Project cheetah) संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आतापर्यंतच्या लक्षणांमुळे उत्सुक आहोत, परंतु खात्री करण्यासाठी आम्हाला ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागेल.


चिता कन्झर्वेशन फंड (CCF) चे कार्यकारी संचालक लॉरी मार्कर म्हणाले की, "आशा गर्भवती असल्यास, ही तिची पहिलीच वेळ आहे. नामिबियामध्येच हे सर्व घडले असावे. ते जंगलात दिसले. जर ती गर्भवती असेल तर तिला एकांत आणि शांत वातावरण दिले पाहिजे. तिच्या आजूबाजूला कोणी नसावे. यासोबतच तिच्या आसपास खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था असावी."


डॉ. लॉरी मार्कर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, "आशा जंगलातून आली आहे, त्यामुळे ती गर्भवती असण्याची शक्यता आहे. तसे असेल तर हे चित्ता प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यवस्थापनास मदत करण्यासाठी विशेष प्रशिक्षित कर्मचारी जमिनीवर तैनात केले पाहिजेत. आशाला त्याचा ताण कमी करण्यासाठी मोकळी जागा आणि शांत वातावरण आवश्यक आहे.  जर आशाने एका पिल्लाला जन्म दिला तर ती नामिबियातील 8 चित्तांनंतरची दुसरी भेट असेल."