नवी दिल्ली : मल्याळम मॅगझीन गृहलक्ष्मीचं कवर पेज सध्या चर्चेत आहे. यात अभिनेत्री गीलू जोसेफ स्तनपान करताना दिसत आहे. 


आम्हाला डोळे फाडून पाहू नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कवर पेजवरून सार्वजनिक ठिकाणी लहान मुलाला स्तनपान करताना सहजताने पाहावं, असा हा संदेश आहे. या कॅम्पेनची टॅगलाईन आहे, आम्हाला डोळे फाडून पाहू नका, कारण आम्हाला मुलांना स्तनपान करायचं आहे.


स्तनपान करण्याचे अनेक फायदे 



लहान मुलांना स्तनपान करण्याचे अनेक फायदे आहेत, अजूनही मुलांच्या गरजेनुसार आई त्यांना स्तनपान करू शकत नाही. असं का होतं, तर सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीने त्याकडे पाहतात, त्यामुळे.


मल्याळम अभिनेत्री गीलू जोसेफ


फोटोत दिसणारी महिला मल्याळम अभिनेत्री गीलू जोसेफ है, मॅगझीनच्या कव्हरवर गीलू जोसेफच्या कपाळावर कंकू लावण्यात आला आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे.


या कव्हरपेजवर लिहिलंय की


त्यांच्या मांडीवर एक मुलं आहे, ज्याला स्तनपान जात आहे. मॅगझीनच्या कव्हरला एका पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. यासोबत लिहिलं आहे. या कव्हरपेजवर लिहिलंय की केरळच्या सर्व मातांनी आता सांगावं की, आम्हाला अशा नजरेनं आता पाहणं बंद करा.