Danger! 2 मिनिटात तयार होणारी Maggi खात असाल तर थांबा!
Maggi 2-Minute : रोजच्या भाज्या (Vegetables) वेगळ्या म्हणजे किती वेगळ्या करणार? त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊन सगळेच कंटाळतात. म्हणून रोजच्याच भाज्यांना चव आणण्यासाठी महिलांकडून मॅगी मसालाचा (Maggi Masala) वापर केला जात आहे. या मॅगीमुळे भाज्यांवर भुरभुरुन चविष्ट करायचा प्रयत्न केला जातो. पण भाज्यांना चविष्ट करणारा मॅगी मसाला भेसळयुक्त (Maggi Masala adulterated) तर नाही ना?
Maggi Special Masala : हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असल्यानं एखादा पदार्थ खावा की खाऊ नये? असा भितीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अन्नधान्य, भाज्या, दूध यांसारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात भेसळ (adulterated) केली जाते. यामुळे लोकांना खाणं-पिणंच अवघड झाले आहे. आपल्या स्वयंपाकघरात आढळणारे तिखट मसालेदेखील भेसळीपासून दूर नाहीत. कित्येक दुकानदार हळद, जीरे, गरम मसाला, भाजीचा मसाला, मिरची पावडर, इत्यादी मसाले उघड्यावर ठेवून त्याची विक्री करत असल्याचं आपण पाहिलं असेलच. जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवण्याच्या नादात मसाले आणि अन्य खाद्यपदार्थांमध्ये सररास भेसळ केली जाते. पण याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
दरम्यान हरियाणातल्या (Harayana) फरिदाबादमध्ये एका छोट्याशा कारखान्यात मॅगी मसाल्यात (Maggi Masala) भेसळ केली जात होती. मॅगी मसाला तयार करून तो मॅगीच्या पाऊचमध्ये भरला जायचा. त्यानंतर सगळे पाऊच बॉक्समध्ये भरून त्याची बाजारात विक्री केली जायची. मात्र पोलिसांना नकली मॅगी (Fake Maggi) मसाल्याची कुणकुण लागली आणि छापा मारत त्यांनी भेसळखोरांचा पर्दाफाश केला.
वाचा : नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी Dream11 ची खास ऑफर!
भेसळखोरीच्या कारखान्यातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नकली मॅगी मसाला जप्त केलाय. या रॅकेटनं आतापर्यंत कुठे कुठे या नकली मसाल्याची विक्री केलीय त्याचा पोलीस शोध घेण्याचे काम सुरू आहे.
बाजारात विकले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यास पुरक आहेत की नाही यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (Food and Drug Administration) वेळोवेळी सँपल टेस्टिंग (Sample Testing) केली जाते. 2018-19 या वर्षात जवळपास 1 लाख 6 हजार 459 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यातील 28 % नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचं स्पष्ट झालंय. यातून भेसळखोरीची पाळंमुळं किती खोलवर रूजलीयेत हे स्पष्ट होतंय. त्यामुळे बाजारातून सामान खरेदी करताना पॅकिंगची तारीख, एक्स्पायरी डेट, FSSAIचं लेबल या सगळ्या बाबी तपासूनच खरेदी करा, कारण सवाल तुमच्या आरोग्याचा आहे.
अशी करा भेसळयुक्त मसल्यांची तपासणी
1.हळद : हळदीला पाण्यात मिसळा. यातील रंग नाहीसा झाल्यास समजून जा की भेसळ झाली आहे.
2.धणे पावडर : धणे पूडमध्येही बारीक-बारीक तण तसेच ठेवून दळली जाते. यामुळे भेसळ ओखळणं फारच कठीण होतं. धणे पूडमध्ये सुगंध नसणं म्हणजे ती भेसळयुक्त असल्याचा पुरावा आहे.
3. तिखट : एका ग्लासमध्ये पाणी घ्या. पाण्यामध्ये तिखट मिसळा. तिखट पाण्यावर तरंगल्यास ते शुद्ध आणि तळाला गेल्यास तिखट भेसळयुक्त असल्याचं समजा.
4. दालचिनी : दालचिनी हातावर रगडून पाहा. हातावर त्याचा रंग न लागल्यास दालचिनी भेसळयुक्त आहे.
5. मीठ : सामान्य मीठ आणि आयोडिनयुक्त मीठ ओळखण्यासाठी एक बटाटा घ्या. बटाटा बरोबर मधोमध कापा. एकीकडे सामान्य मीठ आणि दुसऱ्या कापावर आयोडिनयुक्त मीठ घ्या. त्यावर लिंबूचे काही थेंब मिसळा. 7 ते 10 मिनिटांनंतर त्याचा रंग निळा झाल्यास ते आयोडिनयुक्त मीठ आहे. रंग निळा न झाल्यास ते मीठ सामान्य आहे, हे ओळखा.
6. केसर : एका ग्लासमध्ये पाणी घ्या. केसर पाण्यावर तंरगल्यास, ती शुद्ध असल्याचं समजा.