हे काय? Indian Railway च्या एसी कोचमधून नूडल्स आणि चॉकलेट करतायत प्रवास? पण का?
तुम्ही कधी चॉकलेट आणि मॅगीने या कोचमधून प्रवास केल्याचे ऐकले आहे का?
मुंबई : आपल्यापैकी सगळ्याच लोकांनी आयुष्यात एकदा तरी रेल्वेनं प्रवास केला असेलच, लांबचा प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वे हा एक चांगला पर्याय आहे, कारण यामधून प्रवाशी कमी पैशात, प्रवास करु शकतात, तसेच चांगल्या सुखसोयी देखील पुरवल्या जाता. आतापर्यंत तुम्हाला हेच माहित असेल की, रेल्वेनं फक्त प्रवाशीच प्रवास करतात, खास करुन एसी कोचमध्ये तर फक्त प्रवाशीच प्रवास करतात. परंतु तुम्ही कधी चॉकलेट आणि मॅगीने या कोचमधून प्रवास केल्याचे ऐकले आहे का?
परंतु रेल्वेच्या हुबळी विभागाने हा कारनामा केला आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने चॉकलेट आणि इतर खाद्यपदार्थ गोव्यातील वास्को द गामा येथून दिल्लीला नेण्यासाठी एसी कोचचा वापर केला आहे. असे करण्याचे कारण असे आहे की, हे सामान एका विशिष्ट तपमानावर दुसऱ्या ठिकाणी नेणे आवश्यक होते, अन्यथा ते खराब होतील.
चॉकलेट आणि नूडल्स सारख्या वस्तूंनं सुरक्षित वाहतुकीसाठी रेल्वेच्या एसी कोचमध्ये ठेवण्यात आले. खरेतर असं सगळं सामान वाहून नेण्यासाठी आपण रेल्वेच्या सामान कोचचा किंवा मालवाहतूक ट्रेनचा वापर करतो. परंतु या सामानाला मालवाहतूक कोचमधून न पाठवता एसी कोचमधून पाठवले, ज्यामुळे ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
एवढेच नव्हे तर संपूर्ण एसी कोच असलेल्या या ट्रेनने प्रवाशांविना गोवा ते दिल्ली प्रवास केला. यामध्ये त्यांच्या ट्रेनच्या एसी कोचमधून मॅगी आणि चॉकलेटने प्रवास केला.
रेल्वेने सुमारे 163 टन चॉकलेट आणि नूडल्स पाठवली होती. या सर्वांना वास्को द गामा रेल्वे स्थानकावरून रेल्वेच्या 18 एसी डब्यांमध्ये चढवून दिल्लीला पाठवण्यात आले आहे. हे सगळं सामान AVG लॉजिस्टिकचे होते.
ज्यानंतर ही अनोखी एसी पार्सल ट्रेन सुमारे 2115 किमीचा प्रवास पूर्ण करून दिल्लीला पोहोचली आहे. एसी डब्यातील या मालवाहतुकीमुळे रेल्वेला 12.83 लाख रुपये मिळाले.
एसी कोचचे एअर कंडिशनर कामी आले
चॉकलेट आणि नूडल्स वगैरे नेण्यासाठी कमी तापमानाची वाहने आवश्यक असतात, त्यामुळे हुबळी विभागाने निष्क्रिय एसी कोच वापरून वाहतुकीसाठी वापरण्याची योजना आखली.
भारतीय रेल्वेच्या मते, चॉकलेट आणि नूडल्स सारख्या वस्तू रेल्वेच्या बेबंद एसी डब्यांचा वापर करून गोव्याहून दिल्लीला पाठवण्यात आल्या आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वेने या निष्क्रिय एसी कोचचा वापर चॉकलेट आणि नूडल्ससारख्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी करण्याचा विचार केला होता.
दक्षिण पश्चिम रेल्वेचा पुढाकार
हुबळी विभागाच्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिटने त्यांच्या पारंपारिक वाहतूक क्षेत्रा व्यतीरिक्त एसी कोचमध्ये असे सामानाचा प्रवास करण्याची ही अभिनव संकल्पना राबवली आहे. हुबळी विभागाचे रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी याबद्दल सांगितले की, रेल्वे आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तयार आहे. हे ग्राहकांद्वारे देखील वापरले जाते कारण ते कमी खर्चिक आणि सुरक्षित देखील आहे.
पार्सल पाठवण्याचा नवीन मार्ग
हुबळी विभागाने ऑक्टोबर 2020 पासून पार्सलच्या वाहतुकीतून एक कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. सप्टेंबर 2021 मध्येच हुबळी विभागाने अशा प्रकारे 1.58 कोटी रुपयांची कमाई केली आहे.