कुंभमेळ्याला जायचं आहे, पण राहायचं कुठे? सरकारने उभारलेत टेंट्स, मिळणार 5 स्टार सुविधा; जाणून घ्या A टू Z माहिती
mahakumbh 2025: तुम्ही जर या वर्षी आयोजित केलेल्या कुंभमेळ्याला जाणार असाल आणि तिथे राहायचं कसं? हा प्रश्न पडत असेल तर अजिबात कळजी करू नका. उत्तर प्रदेश प्रशासनाने या कुंभमेळ्यामध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय अगदी 5 स्टार होटेलसारखी केली आहे.
Kumbh Mela 2025: हिंदू पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांनी अमृत (अमरत्वाचे अमृत) काढण्यासाठी समुद्रमंथन केले. अमृतासाठी त्यांच्यात घनघोर युद्ध झाले आणि संघर्षाच्या दरम्यान प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. ही ठिकाणे कुंभमेळ्याची पवित्र स्थळे बनली. सर्वात महत्त्वाच्या आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक कुंभमेळा यावर्षी 13 जानेवारी 2025 पासून 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. दर 12 वर्षांनी होणारा हा भव्य कार्यक्रम लाखो भाविक, संत आणि पर्यटकांना आकर्षित करतो. फक्त भारतातीलच नाही तर विदेशातील पर्यटक सुद्धा या मेळ्यात सहभागी होतात. या भव्य मेळाव्यासाठी प्रशासन जय्यत तयारी करत आहे.
तुम्ही जर या वर्षी आयोजित केलेल्या कुंभमेळ्याला जाणार असाल आणि तिथे राहायचं कसं? हा प्रश्न पडत असेल तर अजिबात कळजी करू नका. उत्तर प्रदेश प्रशासनाने या कुंभमेळ्यामध्ये आयआरसीटीसी (IRCTC) द्वारे पर्यटकांच्या राहण्याची सोय अगदी 5 स्टार हॉटेलसारखी केली आहे. भाविकांना राहण्यासाठी टेंट सिटी बनवण्यात आली आहे. जाणून घ्या कुंभमेळ्यातील अलिशान सोयीसुविधा.
टेंट सिटी कुठे बनवली आहे?
ही टेंट सिटी प्रयागराज येथील नैनीमध्ये सेक्टर 25 अरेल रोडवर बनण्यात आली आहे. टेंट सिटी त्रिवेणी संगमपासून 3.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. टेंट सिटीपासून घाटांपर्यंत पोहचण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
टेंट कोणकोणत्या सुविधांनी सज्ज आहे?
आयआरसीटीसी (IRCTC) च्या टेंट सिटीमध्ये सुपर डीलक्स टेंट हाऊस आणि व्हिला टेंट हाऊस आहेत. या तंबूंमध्ये राहणाऱ्यांना बाथरूममध्ये 24 तास गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. तंबू उबदार ठेवण्यासाठी रूम ब्लोअर्स उपलब्ध असतील. टेंटमध्ये लिननचे बेड, टॉवेल आणि प्रसाधन सामग्री देखील दिली जाईल. या सुविधांमध्ये जेवणाचाही समावेश आहे. व्हिला टेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा बनवली आहे. जिथे बसून पर्यटक टीव्ही पाहू शकतात. टेंट सिटीमध्ये राहणाऱ्यांसाठी सीसीटीव्हीची सुविधा, प्रथमोपचार सुविधा, 24x7 आपत्कालीन मदत देखील उपलब्ध आहे.
या टेंट्सचं भाडं किती?
तुम्हाला सुपर डीलक्स टेंट घ्यायचा असेल तर दिवस आणि रात्रीसाठी 18000 मोजावे लागतील. तुम्ही व्हिलामध्ये राहण्याचा विचार करत असाल तर त्याचे भाडे 24 तासांसाठी 20000 रुपये आहे. पौर्णिमेच्या स्नानापासून हा कुंभ मेळा सुरू होतो त्या आधी हे टेंट बुक केल्यास 10 टक्के सूट मिळेल.
या टेंट्सची बुकींग कशी कराल?
आयआरसीटीसी (IRCTC) च्या https://www.irctctourism.com/mahakumbhgram या वेबसाइटवर तुम्ही आवडीनुसार टेंट बुक करू शकता. त्याशिवाय खासगी (private) कंपनीच्या https://kashiyatra.in/mahakumbh-2025-tent-booking/ या वेबसाइट वरुन ही टेंट बुक करू शकता. या विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही IRCTC ची https://www.irctc.co.in/nget/train-search ही वेबसाइट तपासून पहा. टेंट्सच्या चौकशीसाठी 14646/08044647999 /08035734999 या क्रमांकावर संपर्क करू शकता.