मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार असलेल्या भारतरत्न डॉ. भीमराव रावजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्य प्रदेशमध्ये झाला. बाबासाहेब या नावानेच ते जनसामान्यात प्रचलित झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संविधानाचे शिल्पकार अशी त्यांची जगात ओळख आहे. संविधान वाचून त्यांची दूरदृष्टी आणि व्यापकता याचा अंदाज बांधता येऊ शकतो. 


बाबासाहेबांचा जन्म हिंदू धर्माच्या महार जातीमध्ये झाला. तेव्हा जाती व्यवस्थेचा पगडा समाजावर होता. पण आता २१ व्या शतकात परिस्थीती अचानक बदलली असे नाही. आजही गरीबी, जाती व्यवस्था मधूनच डोके वर काढत असते.


हीच गरीबी हटविण्यासाठी बाबासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले. त्यांनी दिलेले संदेश स्वातंत्र्यकाळात जेवढे उपयोगी होते, तेवढेच तंतोतंत आजच्या काळातही लागू होतात. 


 १) मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव शिकवतो.


२) आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.


३) एक महान व्यक्ती एका प्रतिष्ठित व्यक्तीपासून वेगळा असतो, कारण तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो. 


४) मनाचा विकास मानव अस्तित्वाचे परम लक्ष्य असावे.


५) आम्ही सर्व प्रथम आणि अंतिमही भारतीय आहेत


७) मनुष्याच्या विचाराला प्रचार-प्रसाराची गरज असते. जसे की एका रोपट्याला पाण्याची गरज असते. नाहीतर दोघेही कोमेजून आणि मरून जातील.


८)  मी एका समुदायाच्या प्रगतीचे मोजमाप महिलांच्या मिळवलेल्या प्रगतीतून करतो.


९) जिथे नैतिकता आणि अर्थशास्त्र यामध्ये संघर्ष होतो तिथे अर्थशास्त्राचा विजय होतो. 


१०)  प्रत्येक व्यक्ती जो "MILL" चा सिद्धांत जाणतो, एका देशाने दुसऱ्या देशावर राज्य करणे योग्य नाही, त्यांनी हेदेखील स्वीकार करावे की एका वर्गाला दुसऱ्या वर्गावर राज्य करता येणार नाही. 


११) आपल्या भाग्यापेक्षा आपल्या ताकदीवर विश्वास ठेवा.


१२) जर मला वाटले सविंधानचा दुरुपयोग होतोय तर संविधान जाळणारा पहिला मी असेन.


१३) जोपर्यंत तुम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत कायद्याचे स्वातंत्र्य ही बेमानी ठरते.