नवी दिल्ली : शिंदे गटाच्या खासदारांनी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे. शिंदे गटाच्या खासदारांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनाच मतदान केलं होतं. भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर अनेक जण शिंदे गटात सहभागी होत आहेत. ज्यामध्ये खासदारांचा देखील समावेश आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने मार्गारेट अल्वा यांना मतदान करणार असल्याचं म्हटलं होतं.


एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांनी देखील मतदान केलं. नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर कॉंग्रेस, मायावती यांचा बहुजन समाज पक्ष, चंद्राबाबू नायडू यांचा तेलगु देसम पक्ष, अकाली दल आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट यांनी जगदीप धनखड यांना मतदान केले.


तेलंगणा राष्ट्र समिती, आम आदमी पार्टी आणि शिवसेनेच्या 9 खासदारांनी मात्र मार्गारेट अल्वा यांना मतदान केले.


राज्यसभा आणि लोकसभेच्या 780 खासदारांपैकी 725 खासदारांनी मतदान केले. त्यातील 15 मते अवैध ठरली. धनखड यांना 528 तर विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली होती.