नवी दिल्ली : राज्यातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि विजय वेडट्टीवार हे जयपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. हे एकून सहा नेते सोनियांकडे बैठकीला निघाले आहेत. सोनिया गांधी यांच्या दिल्लीतल्या दसजनपथवर महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जो निर्णय होईल, त्यानंतर ते पर्यायी सरकारसाठी शिवसेनेला पाठिंबा देणार किंवा नाहीत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र सुत्रांच्या माहितीनुसार शिवसेना या पर्यायी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायचा किंवा सत्तेत सहभागी व्हायचं किंवा नाही यावर निर्णय होत आहे. 


या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया यांच्या घराला बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सोनिया गांधी या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सक्रीय प्रचारात सहभागी नसल्या, तरी सत्तेचे सर्व मुद्दे त्यांच्याकडे चर्चेला येत आहेत.


भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेसकडून पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मात्र शेवटचा निर्णय काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.


जयपूरमध्येच सध्या काँग्रेसचे आमदार थांबले आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार नसल्याने या आमदारांना राजस्थानात नेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.