अमर काणे, झी मीडिया, गुवाहाटी : राज्यात राजकीय घडामोड सुरु असताना गुवाहाटीतून मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. गुवाहाटीत थांबलेल्या बंडखोर आमदारांचा मुक्काम आणखी 3 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. राज्यात सुरु असलेल्या घडामोडी आणि आमदारांची सुरक्षितता पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. (maharashtra political crisis booking of rebel mlas rooms at hotel radisson extended to 30 June 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत हॉटेलचं 27 जूनपर्यंत बुकिंग होतं. मात्र आता 30 जूनपर्यंत रेडिसन हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलं आहे. मात्र आमदार 30 जूनपर्यंत राहणार आहेत की नाही, याबाबत कोणतीही निश्चितता नाही. 


कायदेशीर लढाई, उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव, इतर पक्षांसोबत चर्चा या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार आहे. सत्तासंघर्षाच्या काळात मुंबईतील खळबतं सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विभागप्रमुख ते राष्ट्रीय कार्यकारणी अशा गल्ली ते दिल्ली पर्यंत बैठकांचा सपाटा लावला आहे. 


तसेच दुसऱ्या बाजूला बंडखोर गटाच्या अनेक गुप्त  बैठका होत आहेत. तसेच दीपक केसरकर यांनी शनिवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राज्यात या क्षणी येणं योग्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता बंडखोर आमदार आणखी काही दिवस गुवाहाटीतच मुक्कामी असणार आहेत.