मुंबई : एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) हे आता मंत्रिमंडळात सहभागी होणार आहे. केंद्राकडून आलेल्या आदेशानंतर फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार आहेत. आधी फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभाग घेणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. (maharashtra political crisis devendra fadnavis join state cabinet as deputy chief minister after bjp  national president j p nadda request)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आज (30 जून) दुपारी राजभवनात सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर राजभवनातच पत्रकार परिषद घेण्यात आली. फडणवीस यांनी आधी या पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळेस फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर केलं. सोबत स्वत: मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र यानंतर नवा ट्विस्ट आला. 


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी ट्विट आणि करत आणि माध्यमांसमोर येत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं, असा आग्रह केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देवेंद्र यांना 2 वेळा फोनद्वारे संपर्क साधल्याचं समोर आलं. यानंतर अखेर फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता थोड्याच वेळात फडणवीस एकनाथ शिंदेसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.