नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Political Crisis) या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांची मागणी मान्य केली आहे. निवडणूक आयोगाने ठाकरेंना 4 आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. (maharashtra political crisis election commission of india give 4 week time for uddhav thackeray group on shiv sena party claim)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे 23 ऑगस्टला मुदत वाढवून देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार  4 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती.


एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा केलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत दिली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. तसेच निवडणूक आयोगाने याबाबत कोणताही निर्णय देऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते.


मात्र त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षावर दावा करण्यासाठी हवी असलेली सर्व कागदपत्रं उद्धव ठाकरेंना  चार आठवड्यात सादर करावी लागणार आहेत.