Shiv Sena Symbol Dispute : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ( Eknath Shinde ) होऊन आता पाच महिने होत आले. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासह हिवाळी अधिवेशन तोंडावर आहे. पण शिवसेना (Shivsena) कुणाची, शिंदे गटातील 16 आमदार पात्र की अपात्र याबाबत सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आणि निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरुच आहे. त्यात आता 12 डिसेंबरला निवडणूक आयोगासमोर पक्षाचं अधिकृत चिन्हं कुणाचं.. शिवसेना कुणाची.. शिंदेंची की ठाकरेंची, (Shinde Group vs Thackeray Group) या प्रकरणी सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांनी दिलेल्या कागदपत्रांची छाननी निवडणूक आयोगाकडून सुरु आहे, त्याच्याच आधारे शिवसेना कुणाची यासंबंधी 12 डिसेंबरला निकाल देण्यात येईल. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं आणि शिवसेनेचं नाव गोठवण्यात आल्यानंतरच्या या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलंय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान शिंदे गटातील 16 आमदारांच्या पात्रतेसंबंधी मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. पण पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे मंगळवारी होणारी सुनावणीही पुढे गेलीय. सुनावणी पुढे गेल्यामुळे ठाकरे गटानं उघड नाराजी व्यक्त केलीय..


शिंदेंच्या बंडानंतर काहीच दिवसात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला आणि तेव्हापासून ही सुनावणी सुरु आहे. 5 महिन्यात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. अंधेरी पोटनिवडणुकीचं (Andheri By Poll Election) कवित्व रंगलं. त्यापूर्वी 30 वर्षांपासून शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवलं गोलं. त्यानंतर आता 12 डिसेंबरला चिन्ह आणि पक्षाच्या नावाची महत्त्वाची सुनावणी होतेय. त्यामुळे या सुनावणीत काय होतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय..


हे ही वाचा : PM Narendra Modi यांची पुन्हा बदनामी, कोणी केली मोदींची तुलना रावणाशी?


पक्ष आणि चिन्हावर दोन्ही गटाचा दावा
शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी जोरदार युक्तिवाद आतापर्यंतच्या सुनावणीत केले गेलेत. शिवसेनेचं अधिकृत चिन्हच जर शिंदे गटाला मिळालं तर शिवसेना पक्षावरचा शिंदे गटाचा दावा आणखी मजबूत होईल. शिवसेना पक्षावरच्या अधिकृत दाव्याच्या दृष्टीनं शिवसेनेच्या चिन्हावरचा दावा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. म्हणूनच दोन्ही गट धनुष्यबाण चिन्हासाठी आग्रही आहे.