नवी दिल्ली : दिल्लीतल्या राजपथावरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलाय. 


शिवराज्यभिषेक सोहळ्याचा देखावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठ्या दिमाखात राजपथावर अवतरला होता. 


चित्ररथाच्या माध्यमातून शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा देशाने अनुभवला. कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या 'तेज तम अंस पर...' या काव्याच्या सूरांनी राजपथ परिसर दणाणून गेला होता. 


आसाम दुसऱ्या तर छत्तीसगड तिसऱ्या स्थानावर


महाराष्ट्राच्या याच रथाने प्रथम क्रमांक पटकावत दिल्लीवर महाराष्ट्र आणि मराठीचा झेंडा फडकावलाय. या चित्ररथांच्या स्पर्धेत आसामने दुसरा तर छत्तीसगडने तिसरा क्रमांक पटकावलाय.