मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त आपलं गृहराज्य गुजरातच्या दौऱ्यावर असणार आहेत. मोदींकरता इथे काही कार्यक्रमांच आयोजन करण्यात आहे. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ते साबरमती आश्रमात जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गांधी जयंती निमित्त मोदी आज देशाला उघड्यावरील शौच्छातून मुक्त (ओडीएफ) घोषित करणार आहेत. बुधवारी गांधी जयंती निमित्ताने गुजरातमध्ये आणखी काही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर महात्मा गांधी यांनी मानवंदना दिली.



आज देशभरात 35 शहरांमध्ये महात्मा गांधीच्या प्रतिमेचे अनावण करण्यात येणार आहे. ही प्रतिमा नोएडामध्ये राहणारे पद्मभूषणने सन्मानित केलेले मूर्तिकार राम वी सुतार यांनी तयार केल आहे. बापूंची ही प्रतिमा फक्त भारतातच नाही तर इतर देशात म्हणजे अमेरिका, जपान, कॅनडा, मंगोलिया सारख्या देशातही प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे.  


अहमदाबादच्या साबरमती येथी गांधी आश्रमाची सुरूवात सकाळी 8.30 वाजता सर्वधर्म प्रार्थना करून होते. तसेच प्राथमिक शाळेचे जवळपास 900 विद्यार्थी साबरमती आश्रमात एकत्र येणार आहेत. त्यामधी काही विद्यार्थी 'अहिंसा' वर गांधींचे विचार आणि उपदेश व्यक्त करतील. असा असेल आजचा गांधी आश्रमातील कार्यक्रम.




काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी माजी पंतप्रधा लालबहादूर शास्त्री यांना विजय घाटवर मानवंदना दिली.