Mainpuri By Poll Results : एकीकडे गुजरात आणि हिमालच प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल हाता येत असताना उत्तर प्रदेशच्या मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागलं होतं. या जागेवर समाजवादी पक्षाच्या उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (dimple yadav) यांच्या पत्नी डिंपल यादव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर भाजपने (BJP) रघुराज सिंह शाक्य यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. तब्बल 2 लाख 88 हजार मतांनी डिंपल यादव यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीपासून डिंपल यादव या जवळपास एकतर्फी विजय मिळवणार हे निश्चित झाले होते. शिवपाल यादव यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जसवंतनगर मतदारसंघात डिंपल यादव यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली. डिंपल यादव यांना 618120 मते मिळाली आहेत. तर भाजपचे रघुराज सिंह शाक्य यांना 329659 मते मिळाली आहेत.  सकाळपासून मैनपुरीच्या पाचही विधानसभा मतदारसंघात डिंपल यादव आघाडीवर होत्या. डिंपल यादव यांच्या विजयादरम्यान शिवपाल सिंह यादव यांनी सपामध्ये प्रवेश केला आहे. अखिलेश यादव यांनी प्रसपाचे सपामध्ये विलीनीकरण केले आहे.


 


डिंपल यादव यांच्यासाठी निवडणूक का महत्त्वाची?


समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मैनपुरी लोकसभा जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव सपाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने ही जागा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्याचवेळी भाजपने रघुराज सिंह शाक्य यांना त्यांच्यासमोर उभे केले आहे. संपूर्ण निवडणुकीत समाजवादी पक्षाने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप भाजपवर केला होता.