मुंबई : देशाच्या तिसऱ्या महिला मेजर जनरल माधुरी कानिटकर (Madhuri Kanitkar) यांनी शनिवारी लेफ्टनंट जनरल पद स्वीकारलं. या पदावर पोहोचणाऱ्या त्या सशस्त्र दलातील तिसऱ्या भारतीय महिला अधिकारी आहेत. फोर्समध्ये दुसऱ्या सर्वात मोठं पद स्वीकारणाऱ्या या पहिला महिला आहेत. बाल रोग विशेषज्ञ माधुरी कानिटकर यांनी 37 वर्ष भारतीय सेनेत काम केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सशस्त्र सेना मेडिकल कॉलेज पुणेच्या माजी डीन माधुरी कानिटकर या चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) अंतर्गत इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफच्या मुख्यालयात रूजू झाल्या आहेत. कानिटकर यांना गेल्यावर्षी लेफ्टनंट जनरल पदाकरता निवडण्यात आलं मात्र पद रिकाम नसल्यामुळे त्यांना आता पदभार देण्यात आला. 



माधुरी कानिटकर यांचे पती देखील लेफ्टनंट जनरल आहेत. या रँकपर्यंत पोहोचणारे माधुरी आणि राजीव हे सशस्त्र दलातील पहिले दाम्पत्य आहेत. नौदलातील वाइस-एडमिरल आणि सर्जन पुनीता अरोरा लेफ्टनंट जनरल पदाला सांभाळणाऱ्या पहिला महिल्या आहेत. त्यानंतर पद्मावती बंदोपाध्याय भारतीय वायुसेना (IAF)यांनी देखील भारतीय सेनेत दुसरं सर्वात मोठं पद सांभाळणारी दुसरी महिला होत्या. 



माधुरी कानिटकर यांना सेनाच्या दिल्लीतील मुख्यालयात चीफ ऑफ डिफेंस स्टाफ अंतर्गत तैनात करण्यात आलं होतं.  सीडीएस हे असं पद आहे जे भारत सरकारमध्ये सल्लागारच्या रुपात कार्य करते. तिन्ही सेना म्हणजे आर्मी, नौसेना आणि वायुसेनेशी संबंधित सर्व प्रकरणात सल्लागार म्हणून कार्य करणार आहेत. 


माधुरी कानिटकर यांनी 1980 मध्ये एमएमबीबीएसमधून पदवी घेतली. त्यांनंतर त्यांनी पीडियाट्रिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. चार दशके लष्कराच्या मेडिकल सर्व्हिस क्षेत्रात काम केल्यानंतर त्या लष्करातील पहिल्या ट्रेन पीडियाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट व नंतर लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता बनल्या.