नवी दिल्ली : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत हौतात्म्य आलेले मेजर केतन शर्मा यांना लष्करातर्फे सलामी देण्यात आली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत उपस्थित होते. अनंतनागमध्ये अचबल भागात  सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर केतन शर्मा यांना दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेजर शर्मा हे मूळचे मेरठचे आहेत. अवघ्या २९ व्या वर्षी या शूर अधिकाऱ्याने देशासाठी हौतात्म्य पत्करलं. चकमकीत मेजर शर्मा यांच्यासह आणखी एक मेजर रँकचा अधिकारी आणि दोन जवान जखमी झालेत. मेजर शर्मा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी दिल्लीत मेजर शर्मा यांना लष्करातर्फे मानवंदना देण्यात आली.


मेजर केतन शर्मा सोमवारी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. जवळपास १२ तास ही कारवाई सुरु होती. जवानांनी ३ दहशतवाद्यांना ठार केलं होतं. शहीद मेजर यांचं पार्थिव आज दुपारी २ वाजता त्यांच्या घरी पोहोचलं. त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.