मुंबई : देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानाचे कुटुंब किती हिम्मतवान असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 फेब्रुवारी रोजी आसामच्या माजुली जिल्ह्यात वायुसेनेच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात वायुसेनाचे दोन विंग कमांडर घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले. यामध्ये विंग कमांडर डी वत्स यांचा समावेश आहे. 


का होतोय हा फोटो व्हायरल? 


विंग कमांडर दुष्यंत वत्स यांच्या अंत्य संस्कारांतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विंग कमांडर डी वत्स यांची पत्नी कुमुद डोगरा भारतीय सेनेत मेजर पदावर आहेत. नुकतच कुमुद यांनी एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला. मात्र विंग कमांडर डी वत्स आपल्या मुलीला पाहू शकले नाहीत. 



आपलं कर्तव्य बजावत असताना विंग कमांडर वत्स यांचं निधन झालं. याचवेळी पत्नी कुमुद यांनी हिंमत दाखवत या प्रसंगाला सामोरे गेल्या. अंत्य संस्काराच्यावेळी कुमुद यांनी सेनेचा पोशाख करून आपल्या 5 दिवसाच्या मुलीला घेऊन गेली. आणि हाच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.