Dantewada Maoist Attack: दंतेवाडामध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 11 जवान शहीद
Naxal Attack in Dantewada: छत्तीसगडमधून (Chhattisgarh News) धक्कादायक माहिती समोर येत आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Naxal Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Dantewada Maoist Attack: छत्तीसगडमधून (Chhattisgarh News) धक्कादायक माहिती समोर येत आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Naxal Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. माओवाद्यांनी भारतीय जवानांचं पिकअप उडवलं. त्यामुळे अनेक जवान जखमी झाले होते. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. अधिकृतरित्या यावर अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र, या हल्ल्यामध्ये जवानांचं मोठ्या नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Major Naxal Attack in Dantewada Chhattisgarh 11 soldiers of DRG martyred)
दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारं डीआरजी दल माओवादी कॅडरच्या उपस्थितीच्या गुप्त माहितीवरून दंतेवाडा येथून नक्षलविरोधी मोहिमेसाठी रवाना झालं होतं. ऑपरेशन फत्ते केल्यानंतर परत येत असताना अरणपूर रस्त्यावर माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. एका IED स्फोटानंतर गोळीबार देखील झाल्याची माहिती मिळत आहे. भारतीय जवानांनी देखील नक्षलवाद्यांना रोखठोक उत्तर दिलं.
आणखी वाचा - Parkash Singh Badal: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन
नक्षलवाद्यांच्या या भीषण हल्ल्यामध्ये 10 डीआरजी जवान आणि 1 बस ड्राईव्हर शहीद झाले आहेत. 'आमच्याकडे हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. झालेली घटना खूप दुःखदायक आहे. शहीद जवानांच्या कुटुंबांप्रती मी शोक व्यक्त करतो. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आहे. नक्षलवाद्यांना सोडणार नाही', असं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि घटनेची माहिती घेतली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करेल, असं आश्वासन देखील अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना दिलंय.