Parkash Singh Badal: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन

Parkash Singh Badal Passed Away: पंजाबचे (Panjab) माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी मोहालीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री (Former Chief Minister of Punjab) राहिले आहेत.

Updated: Apr 25, 2023, 09:37 PM IST
Parkash Singh Badal: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन title=
Parkash Singh Badal Passed Away

Parkash Singh Badal Passed Away: शिरोमणी अकाली दलाचे संरक्षक आणि पंजाबचे (Former CM Of Panjab) माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी मोहालीतील एका खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 95 वर्षीय बादल (Parkash Singh Badal) यांना आठवडाभरापूर्वी मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

घरी असताना त्यांनी श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी वेळीच उपचार सुरू केले आणि बादल परिवाराने सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, आता त्यांनी पंजाबसह अनेक चाहत्यांनी अलविदा (Parkash Singh Badal Passed Away) केला आहे.

आणखी वाचा - Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा नवा प्लान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रचारात उडी

प्रकाश सिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री (Former CM Parkash Singh Badal) राहिले आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये नेहमी त्यांच्या नावाची चर्चा आजही असते. तर युवकांमधील प्रभावी नेता, अशी त्यांची ओळख होती. प्रकाशसिंग बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी पंजाबमधील अबुल खुराना या छोट्याशा गावात जाट शीख कुटुंबात झाला. शिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) अध्यक्ष सुखबीर बादल (Sukhbir Badal) हे त्यांचे पुत्र आहेत.

दरम्यान, प्रकाशसिंग बादल यांनी अनेकवेळा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. 1970-1971, 1977-1980, 1997-2002 आणि 2007-2017 पर्यंत मुख्यमंत्री होते. पंजाबमधील मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते सर्वात तरुण मुख्यमंत्री देखील होते.

PM Modi यांच्याकडून शोक व्यक्त

प्रकाश सिंह बादल यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झालं. ते भारतीय राजकारणातील एक मोठे व्यक्तिमत्त्व आणि एक उल्लेखनीय राजकारणी होते, ज्यांनी आपल्या देशासाठी मोठं योगदान दिलं. पंजाबच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि अत्यंत कठीण काळात राज्याची धुरा सांभाळली, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.