Andhra Pradesh Rail Accident : देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरुच आहे. आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात घडला आहे. दोन पॅसेंजर ट्रेनची धडक झाल्याने 4 डबे रेल्वे मार्गावरुन घसरले. या भीषण दुर्घटनेत  6 जण ठार तर, 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. या रेल्वे अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 18 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  


नेमका कसा झाला अपघात?


आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील कोठावलसा मंडळातील अलमांडा-कंथकपल्ली येथे हा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. ओव्हरहेड केबल तुटल्याने रायगड पॅसेंजर ट्रेन रुळावरच थांबली होती. मात्र, त्याचवेळी आलेल्या पलासा एक्स्प्रेसने रायगड एक्सप्रेसला धडक दिली. रायगड पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर,  40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 


बांगलादेशमध्ये  मोठा रेल्वे अपघात


23 ऑक्टोबर रोजी बांगलादेशमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला होता. दोन ट्रेनमध्ये भीषण टक्कर झाली होती. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 100हून अधिक जखमी झाले होते. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकापासून सुमारे 80 किमी अंतरावर एका पॅसेंजर ट्रेननं मालगाडीला धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. ही ट्रेन किशोरगढहून ढाक्याच्या दिशेनं निघाली होती. अपघातानंतर घटनास्थळी तत्काळ बचावकार्य  सुरू करण्यात आलं. मात्र हा अपघात इतका भीषण होता की त्यात 20 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.