Cooking Tips : स्ट्रीट फूड खायला आपल्याला सर्वानाच खूप आवडतं, ठेल्यावरचे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. आपण कितीही केलं तरी ठेल्यावरच्या पदार्थाना जी चव असते ती घरी कसेही बनवा ती चव काही केल्या लागतं नाही. तुम्ही ठेल्यावरची दाबेली खाल्लीये का ? नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. स्ट्रीट फूडमध्ये लोकप्रिय अशी ही डिश आहे, चटपटीत मसालेदार दाबेली, मस्तपैकी बटर लावून गरम केलेला पाव आणि त्यात पावला आंबट गोड चटणी लावून भरलेली बटाट्याची भाजी आणि त्यावरची कुरकुरीत शेव आणि डाळिंबाचे दाणे अहाहा ! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्ही कधी घरी दाबेली बनवण्याचा प्रयत्न केलाय का ? कधी घरी मनासारखी दाबेली होत नाही ना ? तुम्हाला माहित आहे का ? स्ट्रीट स्टाईल दाबेली बनवण्यासाठी एक खास सिक्रेट मसाला वापरला जातो. तो मसाला तुम्ही घरी कसा बनवू शकता माहित आहे ? चला तर मग जाणून घ्या. 


साहित्य 


  • धने - पाव कप

  • जिरे- पाव कप 

  • काळीमिरी - १ चमचा  

  • लवंग- १ चमचा  

  • मसाला वेलची - 1

  • दालचिनी 

  • बदामफूल 

  • तमालपत्र 

  • लाल मिरची पावडर 

  • पिठीसाखर 

  • आमचूर पावडर 

  • बडीशेप 

  • सैंधव मीठ 

  • खवलेलं खोबरं 

  • तेल 

  • साखर 


  कृती 


  • एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये धणे, जिरे, काळीमिरी, बडीशेप, लवंग, मोठी वेलची, दालचिनी, बदामफुल, तमालपत्र खमंग भाजून घ्यावे भाजताना त्यात थोडं मीठ घालावं. 

  • भाजलेले मसाले थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात व्यव्यस्थित बारीक करून घ्यावे. जाडसर पूड तयार करून घ्यावी. 

  • ही पूड तयार झाल्यावर त्यात, पिठीसाखर, आमचूर पावडर, सैंधव मीठ, लाल मिरची पावडर, खवलेलं सुकं खोबर घालावं . 

  • हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यावं. 



 (video credit : nutribit.app instagram)


तयार आहे कच्छी स्पेशल दाबेलीचा सिक्रेट मसाला. हा मसाला वापरून चवदार आणि एकदम हटके दाबेली घरच्यांना बनवून खायला घाला आणि सर्वांची वाहव्वा मिळवा.  (how to make dabeli masala at home)