मुंबईः एका मलेशियन कलाकाराने आपले हात, पाय आणि तोंड वापरून सेलिब्रिटींचे पाच पोर्ट्रेट एकत्र रेखाटल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. सैफुल थाकीफ हा 39 वर्षीय माध्यमिक शाळेचा शिक्षक असून तो त्याच्या कलेमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो एकाच वेळी दोन्ही हात आणि पायाने चित्र काढतो. त्‍याच्‍या नवीन टिकटॉक व्‍हिडिओमध्‍ये, थाकीफ केवळ हात आणि पाय दोन्ही वापरत नाही, तर स्केचिंगमध्‍ये तोंडही वापरतो.


मलेशियन कलाकाराने अलीकडेच 'किंग ऑफ पॉप' मायकेल जॅक्सन आणि प्रसिद्ध कॉमेडियन मिस्टर बीन यांचे पोर्ट्रेट त्याच्या पायाने रेखाटलं आहे. त्याने कॉमेडियन आणि व्यंगचित्रकार इमुदा, माजी बॅडमिंटनपटू ली चोंग वेई आणि सेलिब्रिटी शेफसह मलेशियन सेलिब्रिटींचे पोर्ट्रेट देखील बनवले आहेत.


एशिया वनच्या मते, प्रत्येक ड्रॉईंग पूर्ण करण्यासाठी कलाकाराला चार तास लागतात. व्हायरल व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून 26,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.



थाकीफने सांगितले की, 'मी पोर्ट्रेट गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मी खूप व्यंगचित्रे रेखाटली पण त्याला फारशी व्ह्यूज मिळाली नाहीत. आपण रंजक पद्धतीने कला सादर केल्यास ती लोकांना आवडेल आणि आपल्याला अधिक व्ह्यूज मिळतील. त्यामुळे मी कला बनवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जेणेकरून लोकांना माझे काम पाहता येईल आणि आवडेल. असं थाकीफ सांगतो