मी मोबाईल नंबर आधारशी लिंक करणार नाही - ममता बॅनर्जी
सुरक्षेच्या कारणास्तव, सरकारने आधार कार्डला मोबाईलशी जोडणे बंधनकारक केले आहे. 23 मार्चपर्यंत प्रत्येक मोबाईल ग्राहकाने मोबाईल नंबरसोबत आधार लिंक करायचा आहे. अन्यथा त्यानंतर सेवा खंडित करणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे.
कोलकाता : सुरक्षेच्या कारणास्तव, सरकारने आधार कार्डला मोबाईलशी जोडणे बंधनकारक केले आहे. 23 मार्चपर्यंत प्रत्येक मोबाईल ग्राहकाने मोबाईल नंबरसोबत आधार लिंक करायचा आहे. अन्यथा त्यानंतर सेवा खंडित करणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे.
तृणमूल काँग्रेसच्य़ा अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. ममता बॅनर्जी म्हणतात की, 'केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मी विरोध करते आणि म्हणून मी मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडणार नाही.'
सरकारने जुन्या मोबाईल नंबरसाठी आणि नवीन मोबाईल नंबर मिळविण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे.