मुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे, असे सांगत विधानसभेसमोर राडा
एका व्यक्तीने विधानसभेत घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीला रोखले. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे. मला रोखू शकत नाही. मात्र, पोलिसांनी विधानसभेत सोडले नाही.
भोपाळ : एका व्यक्तीने विधानसभेत घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी या व्यक्तीला रोखले. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांचा भाऊजी आहे. मला रोखू शकत नाही. मात्र, पोलिसांनी विधानसभेत सोडले नाही. त्यावेळी या व्यक्तीने जोरदार राडा केला. एएनआय या वृत्तसंस्थेने घडलेल्या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती आणि त्यांच्यासोबत दोन महिला दिसत आहेत.
विधानसभेसमोर ड्युटी करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी रोखल्यानंतर चिडलेल्या एका व्यक्तीने आपण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे भाऊजी असल्याचा दावा केला. तसेच त्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलांनी फोनाफोनी केली आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा बनाव असल्याने पोलिसांनी त्या त्यावक्तीचे म्हणणे न ऐकता सारा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला. मध्यप्रदेशात त्याची चर्चा झाली आणि या चर्चांमुळे शिवराज सिंह यांच्या अडचणी वाढल्या. दरम्यान, बुधवारच्या या गोंधळावर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी वेगळ्याच पद्धतीने उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘मध्यप्रदेशात माझ्या कोट्यवधी भगिनी आहेत आणि अनेक लोकांचा मी मेव्हणा आहे. कायदा आपलं काम करेल'.