इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे सावत्र बापाला त्याच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा झाली. त्यामुळे त्याने आपल्या मुलीला पळवून नेले. ज्यानंतर आता पोलिस या आरोपीच्या शोधात आहेत. खरेतर हे प्रकरण सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. कारण लग्नाच्या अवघ्या 15 दिवसानंतरच या व्यक्तीचं विचार परिवर्तन झालं आणि त्याच्या मनात आपल्या सावत्र मुलीशी लग्न करण्याचा विचार आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर व्यक्तीने विवाहित महिलेबरोबर प्रेम विवाह केला आणि नंतर त्या महिलेच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरला. काही दिवसांनंतर त्याने तिच्या मुलीला पळवून नेले, आता ही महिला पोलिसांकडे आली आहे आणि तिची मुलगी शोधण्याची विनंती केली. त्यानंतर आता आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना इंदूरच्या लासुडिया परिसरातील आहे. येथे सोमवारी एका महिलेने पोलिस ठाणे गाठले आणि आपल्या पतीबद्दल तक्रार दिली. त्यानंतर ही घटना समोर आली आहे. तिने पोलिसांना सांगितले की, खजराना येथे राहणाऱ्या संतोष सिंगसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर लग्नाच्या सुमारे 15 दिवसानंतरच संतोषने तिच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरला.


त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने संतोषची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याला नातं देखील समजावले आणि सांगितले की, ती नात्याने तुझी मुलगी लागते. त्यामुळे तु असे करु शकत नाहीस. हा हट्ट तु सोड. परंतु संतोषवर याचा काही परिणाम झाला नाही. सोमवारी रात्री संतोष आला आणि मुलीला जबरदस्तीने गाडीमधून घेऊन गेला.


पोलिसांनी गुन्हा दाखल केला


महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनी आरोपी आणि त्या मुलीचा शोध सुरू केला आहे. त्याच बरोबर सगळ्याच अँगलने या केसची तपासणी सुरू केली आहे.


पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण घरगुती दिसत असले तरी, शांत राहून चालनार नाही. कारण एका मुलीशी संबंधित ही केस आहे. त्यामुळे कोणती ही रिस्क ते घेऊ इच्छीत नाहीत.