Viral Stunt Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यातील काही व्हिडीओ काळजाचे ठोके चुकवणारे असतात. असाच हृदयाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये यूपीमधील एक व्यक्ती हाय व्होल्टेज विजेच्या तारांवर स्टंट करताना दिसत आहे. (man doing stunt on high voltage electric wires on road in pilibhit uttar pradesh shocking viral video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेलं हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील (UP Viral Stunt Video)  पिलीभीत जिल्ह्यातील आहे. ज्यामध्ये एक माणूस विजेच्या तारेवर स्टंट करताना दिसत आहे. व्हिडिओमधील अतरंगी हा माणूस 11 किलोवोल्ट हाय-टेन्शन पॉवर लाईन्सवर स्टंट करताना दिसतोय. संततधार पावसामुळे वीजपुरवठा ठप्प झाल्याने मोठी दुर्घटना टळली.


कुणी टोमॅटो आणला तर कुणी कांदा..., VIDEO पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल!


व्हिडीओमध्ये हा माणूस विजेच्या तारांवर लटकताना आणि वेगवेगळी हलचाल करत स्टंट करत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्याभोवती जमलेली लोकांची गर्दीही पाहायला मिळते. अनेकांना या व्यक्तीला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. जमलेल्या लोकांनी वीज विभागाला फोन करून माहिती दिली.


पाहा व्हिडीओ-



दरम्यान, वीज विभागातील दोन अधिकारी घटनास्थळावर पोहोचल्यावर त्यांनी या माणसाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. खुप मेहनतीनंतर अखेर या व्यक्तीला खाली उतरवण्यात यश आलं आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. हा व्यक्ती बांगड्या विकण्याचं काम करतो, अशी माहिती स्थानिकांनी दिली होती.